महाकवी पीयूष मिश्रा आणि एक रविवार
एकाच दिवशीच्या वृत्तपत्री मथळ्यांनी इतकं अस्वस्थ व्हावं? लढाईचे दिवस नाहीत, बॉम्ब–वर्षाव नाही, त्सुनामी, महापूर, ज्वालामुखीचा उद्रेक नाही……सारं कसं शांत शांत! मग नेहेमीच्या मध्यमवर्गी स्वस्थतेचा आज मागमूसही का नाही? गुरु लोक म्हणतात तसा आपल्यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट तर नाही? असेल बाबा! माझ्या गावाजवळचं, माझ्या ओळखीतलं गाव अमरावती. भारत स्वतंत्र व्हायच्या सत्तावीस वर्षे आधी ऑलिम्पिकला प्रतिनिधी पाठवणाऱ्या हनुमान …